भंगार चोरट्यांचा खेळ खंडित – पोलिसांची २.१५ लाखांची कारवाई
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. ०४ जून २०२५) -
कटरच्या साहाय्याने लोखंडी इलेक्ट्रिक पोल कापून चोरणाऱ्या दोन भंगार चोरट्यांना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कडून चोरीस गेलेला मुद्देमाल आणि चोरीसाठी वापरलेली गाडी मिळून एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेत असलेले आरोपी अतिक ऊर्फ आंडा सलीम शेख (२९ वर्षे) आणि शाहरुख जाकीर पठाण (२६ वर्षे), दोन्ही राहणार चंद्रपूर असे आहेत.
११ मे २०२५ रोजी विसापूर येथील बीपीएड कॉलेज जवळील 66 केव्ही चंद्रपूर (शास्त्रीनगर) बल्लारशाह विद्युत वाहिनीची पाहणी केली असता सर्व पोल व्यवस्थित उभे होते. मात्र, १३ मे रोजी परत पाहणीदरम्यान पोल क्र. ५४ ते ५९ हे अज्ञात चोरट्यांनी कापून नेलेले आढळले. चोरी गेलेले पोल १२ मीटर लांबीचे होते, एकूण ७७१० किलो वजनाचा आणि १.५४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हरवला होता. या प्रकरणी महापारेषण बल्लारशाहच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयश्री नक्षणे यांनी तक्रार दाखल केली. बल्लारपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३४/२०२५ कलम ३८० भा.दं.वि. नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, आणि स्थानिक माहितीदार यांच्या साहाय्याने दोघा आरोपींचा माग काढला. ३० मे रोजी रात्री ११.४७ वाजता दोघांना अटक करण्यात आली आणि चोरीसाठी वापरलेली वापरती इंट्रा गाडी (MH-30 BD-4502) आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाईत श्याम गव्हाणे, प्रशांत भोयर, मदन दिवटे, आनंद परचाके, व इतर पोलिस कर्मचारी सक्रिय होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.