Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स घुग्घूस / चंद्रपूर (दि. १३ मे २०२५) -        पडोली-घुग्घूस मार्गा...
अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्घूस / चंद्रपूर (दि. १३ मे २०२५) -
       पडोली-घुग्घूस मार्गावरील एमआयडीसी चौकात एका अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील बाळा उद्धव हस्तक वय ६५ वर्षे रा. पिपरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना १३ मे रोजी दुपारी २.२० वाजता घडली.

लग्नाच्या निमित्ताने आलेले, अपघाताचा बळी ठरले:
        धानोरा-पिपरी येथील बाळा हस्तक आणि त्यांचे सहकारी वांढरी फाटा येथे एका लग्नासाठी आले होते. लग्न आटोपून एमआयडीसी चौकात गेले. तेथून परतत असताना अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकी क्र. एमएच ३४ एजी ७९५० जोरदार धडक दिली. यात त्यांच्या मृत्यू झाला तर दुचाकीवरील एक जण जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पडोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठवण्यात आला. जखमीला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले. अज्ञात ट्रक चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. एमआयडीसी चौकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. एमआयडीसी चौकातील अपघाताची वारंवारता वाढत असल्याने स्थानिकांनी त्या भागात वेगमर्यादा आणि सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top