Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: काळी-पिवळी आणि ट्रकच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, १६ जखमी!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
काळी-पिवळी आणि ट्रकच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, १६ जखमी! आमचा विदर्भ - अनंता गोखरे मूल (दि. १४ मे २०२५) -          सिंदेवाहीहून मुलकडे प्रव...
काळी-पिवळी आणि ट्रकच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, १६ जखमी!
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
मूल (दि. १४ मे २०२५) -
         सिंदेवाहीहून मुलकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या एमएच ३४ यू २३९६ या काळी-पिवळी वाहनाची समोरून येणाऱ्या एमएच ४० बीएल ८५२४ क्रमांकाच्या ट्रकला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले, तर १६ जण जखमी झाले. ही घटना १३ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. (Truck Accident)

        मृतांमध्ये वाहन चालक निर्दोष प्रभाकर मोर्हुले (३५, रा. राजोली) आणि मनाबाई देवाजी डांब (७५, रा. सरळपाळ) यांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये शंकर श्रावण चापले (भेंडाळा), अंजनाबाई नीलकंठ आभारे (उसेगाव), संदीप सूर्यभान आमले (नागपूर), रामदास हजारे (जयरामपूर), मारुती देवावार (जयरामपूर), शोभा मोहरल (४०, मोरवाई), उज्वला राऊत (३१, मोरवाही), पूजा गेडाम (२७, राजोली), मारुती वाघाडे (हळदी), आनंदाबाई भगत (हिरापूर), रुजवान राकेश जुमडे (सिंदेवाही), शितल राकेश जुमडे (सिंदेवाही) आदींचा समावेश आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top