StudentAchievement
गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा!
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १४ मे २०२५) -
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श हायस्कुल राजुरा येथील इयत्ता दहावीच्या माध्यमिक शालांत परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. या वर्षी शाळेचा निकाल ९५.७०% इतका आहे. एकूण ९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. शाळेतून प्रथम क्रमांक आदित्य सुभाष साळवे (९१.२०%), द्वितीय क्रमांक मृणाली बंडू भोयर (९०.२०%) आणि तृतीय क्रमांक क्षितिज विनोद वडस्कर (८९.६०%) यांनी मिळवला. या गुणवंत विद्यार्थ्यांचा बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आणि माजी आमदार ॲड. संजय धोटे, अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, सह सचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार यांसह संचालक मधुकर जानवे, अविनाश नीवलकर, मंगला माकोडे उपस्थित होते. यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, नवनाथ बुटले, मेघा वाढई, प्रशांत रागीट, विकास बावणे, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, अंजली कोंगरे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.