आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. 08 मे 2025) -
बल्लारपूर शहरातील बीटीएस चौकातील श्रीहरी ऑटोमोबाइल्स या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरांनी 2 लाख 50 हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना 6 मे च्या मध्यरात्री घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
बीटीएस चौक, गुरुनानक पब्लिक स्कूल समोर असलेल्या अवधेशकुमार शारदानंद शाह यांचे श्रीहरी ऑटोमोबाइल्स हे दुकान आहे. 5 मे रोजी रात्री 9 वाजता दुकान बंद करून शाह घरी गेले. मात्र 6 मे रोजी सकाळी 6 वाजता गुरुनानक पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपॉल लक्ष्मी यांनी शेजारील दुकानदार मनिष राखुंडे यांना फोन करून दुकानाचे शटर खुले दिसत असल्याचे कळवले.
मनिष राखुंडे यांनी तात्काळ अवधेशकुमार शाह यांना माहिती दिली. शाह आपल्या दुकानात पोहचले असता शटर मधोमध उचललेले होते, तर बाजूच्या कुलूपांना हात लावलेला नव्हता. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, टेबलच्या ड्रॉवरचे लॉक तोडून त्यातील 2 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. अवधेशकुमार शाह यांच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 305, 334, (1) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे अधिक तपास करीत आहेत. बल्लारपूर शहरात यापूर्वीही शटर उचलून चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र या घटनेतील चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Advertisement

Related Posts
- ''धाग्यात गुंफलेला विश्वास आणि जबाबदारीचा संदेश''09 Aug 20250
''धाग्यात गुंफलेला विश्वास आणि जबाबदारीचा संदेश''बल्लारपूर मनसे महिला सेनेने पोलीस बांधवांना बांधली ...Read more »
- राजकारणात निष्ठा टिकवणाऱ्या नेतृत्वाचे काँग्रेसतर्फे सन्मान04 Aug 20250
राजकारणात निष्ठा टिकवणाऱ्या नेतृत्वाचे काँग्रेसतर्फे सन्मानबल्लारपूरमध्ये घनश्याम मुलचंदानी यांचा सत...Read more »
- काँग्रेसचा लोकहितासाठी पुढाकार – जुने मीटर परत लावा01 Aug 20250
काँग्रेसचा लोकहितासाठी पुढाकार – जुने मीटर परत लावा"NSUI, युवक व महिला काँग्रेस एकत्र – स्मार्ट मीटर...Read more »
- बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांचा पूज्य सिंधी सेवा समितीच्या वतीने सत्कार12 Jul 20250
बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांचा पूज्य सिंधी सेवा समितीच्या वतीने सत्कारआमचा विदर्...Read more »
- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय! बल्लारशाह जीआरपी चौकीला पोलिस ठाणे बनवा!11 Jul 20250
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय! बल्लारशाह जीआरपी चौकीला पोलिस ठाणे बनवा!सुधीरभाऊंच्या पुढाकारा...Read more »
- बल्लारपूर: वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर 'आक्रोश मोर्चा'08 Jul 20250
बल्लारपूर: वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर 'आक्रोश मोर्चा'२४ तास पाण्यासाठ...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.