आमचा विदर्भ - अनंता गोखरे
पोंभुर्णा (दि. १५ मे २०२५) -
पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथील पांढऱ्या माती परिसरातील हनुमान मंदिराजवळ गुरुवारी सकाळी ९.३० वाजता दोन दुचाकींच्या भीषण धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतकाचे नाव केजराज मोगरकार वय ४५ वर्षे, रा. देवाडा खुर्द असे आहे. गंभीर जखमींमध्ये समीर सोमनकर वय २८ वर्षे रा. देवाडा खुर्द व अमीन सिडाम वय २५ वर्षे रा. कवडजई यांचा समावेश आहे.
कुडेसावली येथील आश्रम शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक पदावर कार्यरत असलेले केजराज मोगरकार व चौकीदार समीर सोमनकर हे दोघे आपल्या MH-34 AW-7465 क्रमांकाच्या दुचाकीवरून देवाडा खुर्दकडे जात होते. तर अमीन सिडाम MH-34 CH-0686 उमरी पोतदार येथून कवडजईकडे जात असताना हनुमान मंदिराजवळ दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली. अपघातानंतर तिघांनाही पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी केजराज मोगरकार यांना मृत घोषित केले, तर गंभीर जखमी समीर सोमनकर व अमीन सिडाम यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर करण्यात आले. घटनेचा पुढील तपास उमरी पोतदार पोलीस करीत आहेत. मृतक केजराज मेश्राम यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व दोन मुली असा परिवार आहे. देवाडा खुर्द गावात या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.