Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्वतःचा ट्रक विकून चोरीची तक्रार करणारा जाळ्यात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वतःचा ट्रक विकून चोरीची तक्रार करणारा जाळ्यात चंद्रपूर गुन्हे शाखेची कारवाई आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा / चंद्रपूर  (दि. ०९ मे २०२५) ...
स्वतःचा ट्रक विकून चोरीची तक्रार करणारा जाळ्यात
चंद्रपूर गुन्हे शाखेची कारवाई
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा / चंद्रपूर  (दि. ०९ मे २०२५) -
        चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रक फसवणूक प्रकरणातील तीन आरोपींना अटक करून ३.७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा प्रकार राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडला. 

        या प्रकरणात फिर्यादी फिरोज नबी शेख वय ४४ वर्ष याने आपला ट्रक क्रमांक MH-40-BL-9705 कर्ज भरण्याचे पैसे मिळवण्यासाठी चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु त्याने तो ट्रक शेख मलिक शेख सईद वय ३९ वर्ष याच्या मदतीने इमरान खान सलीम खान पठाण वय ३७ वर्ष, रा. नागपूर यास ६ लाख रुपयांना विकल्याचे उघडकीस आले. तपासादरम्यान आरोपी इमरान खान याने ट्रकचे सुटे भाग वेगवेगळे करून विक्री केल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सदर ट्रक आणि स्पेअर पार्ट्स किंमत ३.७० लाख रुपये जप्त केले.

        सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, स्वामीदास चालेकर, प्रकाश बलकी, किशोर वैरागडे, अजय बागेसर, प्रमोद कोटनाके, गोपीनाथ नराटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top