आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १५ मे २०२५) -
राजुरा तालुक्यातील तुलाना या छोट्याशा गावातील अभिनय दिनेश मडावी याने महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील दहावी बोर्डाच्या परीक्षेत 91.20% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. अभिनय हा या गावातील पहिला विद्यार्थी आहे ज्याने 91.20% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. परिषद तालुकाध्यक्ष मनोज आत्राम, तालुका सचिव दिपक मडावी आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अभिनयला पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विशेष म्हणजे, अभिनयने कोणतेही शिकवणी वर्ग न लावता स्वअभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. त्याने यशाचे श्रेय आपल्या वडील दिनेश मडावी, आई सपना मडावी, मोठे बाबा सचिन मडावी तसेच शाळेतील मुख्याध्यापक मेश्राम सर, वर्ग शिक्षिका बेलोरकर मॅडम आणि इतर शिक्षकांना दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.