Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा येथे पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या तरुणांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा येथे पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या तरुणांचा सत्कार ॲड. वामनराव चटप यांच्या हस्ते विवेक गुरनुले व प्रशांत भोयर यांचा गौरव आमचा वि...
राजुरा येथे पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या तरुणांचा सत्कार
ॲड. वामनराव चटप यांच्या हस्ते विवेक गुरनुले व प्रशांत भोयर यांचा गौरव
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २९ मार्च २०२५)
        राजुरा तालुक्यातील सोनुर्ली येथील युवक विवेक सुधाकर गुरनुले यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पद मिळवले. तसेच त्यांचे मित्र प्रशांत विजय भोयर यांनीही गरिबीवर मात करत शिक्षण पूर्ण करून पोलिस उपनिरीक्षक पद मिळवण्याचा मान मिळवला. या दोघांच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित सत्कार समारंभात ॲड. वामनराव चटप यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
        समारंभात विवेक गुरनुले आणि प्रशांत भोयर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, याचे उत्तम उदाहरण या दोघांनी घालून दिल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला दिलीप देठे, कपिल इद्दे, रमेश नळे, भाऊजी कन्नाके, मधुकर चिंचोलकर, अनिल बाळसराफ, नरेश गुरणुले, पुंडलिक वाढई यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोघा तरुणांच्या यशामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी इतर तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top