Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ॲड. यादवराव धोटे महाविद्यालय येथे पोक्सो कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ॲड. यादवराव धोटे महाविद्यालय येथे पोक्सो कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. 19 जानेवारी 2025) -       ...

ॲड. यादवराव धोटे महाविद्यालय येथे पोक्सो कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. 19 जानेवारी 2025) -
        ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालित ॲड. यादवराव धोटे महाविद्यालय येथे आज दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी तालुका विधी सेवा समितीमार्फत पोक्सो कायद्याअंतर्गत मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

        याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.यादवराव धोटे मेमोरियल सोसायटीचे सचिव डॉ.अर्पित धोटे यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे सुमित जोशी सचिव, जिल्हाविधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोक्सो कायदेविषयी पीपीटी द्वारे जनजागृती चे धडे दिले व विद्यार्थ्यांशी हितगुज साधून विद्यार्थ्यांच्या मनातील पोक्सो कायदेविषयीचा संपूर्ण संभ्रम दूर केला. तसेच सहदिवाणी न्यायाधीश राजुरा येथील निखिल हेमणे यांनीही विद्यार्थ्यांना पोक्सो कायदेबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच संपूर्ण सहकारी चमूंचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.इर्शाद शेख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणिता पानसे तसेच आभार प्रा.सुप्रिया गोंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता संपूर्ण प्राध्यापक वृंद तसेच कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top