Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिप उच्च प्राथमिक शाळा सांगोडा येथे शाळापूर्व प्रवेश तयारी मेळावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी घेतला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत गडचांदूर (दि. २६ एप्रिल २०२४) - ...

शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी घेतला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
गडचांदूर (दि. २६ एप्रिल २०२४) -
        जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सांगोडा या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी प्रवेश शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास अवताडे  तथा गावाच्या सरपंचा संजना बोन्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आवाळपूर केंद्राचे केंद्र प्रमुख पंढरीजी मुसळे उपस्थित होते. मार्गदर्शक सूचना अनुसार विविध सात टेबलावर विद्यार्थ्यांचे व पालकाचे मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थी प्रगती बाबत नोंदी घेण्यात आल्या. या मेळाव्याला पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश पात्र मुलांना शाळेत दाखल करून घेण्यात आले. नवागताचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. गावात दिंडी काढून वातावरण निर्मिती करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शाळेतील मुख्याध्यापीका शोभा शेंडे, शाळेतील शिक्षक राजेश धांडे, अं.सेविका पुष्पा वरपटकर, रजनीताई बावणे, आशाताई सोनटक्के, सारिकाताई देवाळकर, रंजनाताई हनुमंते, शुभांगीताई बावणे यांचे सहकार्य लाभले. यावेळी मोठ्याप्रमाणावर पालक व नागरिक उपस्थित होते. (aamcha vidarbha) (vidarbha) (gadchandur) (zp school)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top