Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मनसे जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे यांच्या वाढदिवसाप्रसंगी मिठाईचे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. १४ नोव्हेंबर २०२३) -         मनसेचे जिल्हाप्रमुख मंदिप रोडे यांच्या वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांनी अत्यं...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १४ नोव्हेंबर २०२३) -
        मनसेचे जिल्हाप्रमुख मंदिप रोडे यांच्या वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहात व सामाजिक जाणिवेची जाण ठेऊन साजरा केला, मनसेचे तालुका अध्यक्ष आदित्य भाके यांच्या नेतृत्वात शहरात विविध ठिकाणी वाढदिवस व दिपावली चे औचित्य साधून मिठाईचे वाटप करण्यात आले, राजुरा उपजिल्हा रुग्णालयासह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मिठाईचे वाटप करून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मंदिप रोडे ह्यांच्यासाठी शुभ आशिष घेतले. या प्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष आदित्य भाके, तालुका उपाध्यक्ष रोहित बताशांकर, मारोती मेश्राम, शहर सचिव साहिल चौधरी, प्रमोद लोहे, सौरभ चोपडे, आशिष वडस्कर, जगदीश चोपडे, विजय तलांडे आदी सह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top