Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आत्महत्याग्रस्त "त्या" तरुणाचा कुटुंबाला आर्थिक सहाय्य्य करा - शिवसेना तालुकाप्रमुख भरत बिरादार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे जिवती (दि. ११ जुलै २०२३) -         जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील तरुण शेतकरी प्रदीप रमेश राठोड (Pradeep Rame...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
जिवती (दि. ११ जुलै २०२३) -
        जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील तरुण शेतकरी प्रदीप रमेश राठोड (Pradeep Ramesh Rathod) वय २५ यांनी दि. ८ जुलै रोजी कर्जबाजारी व सततच्या नापिकीला कंटाळून शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रदीपला लगेच चंद्रपूर येथील सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले होते मात्र  डॉक्टरांना त्याला वाचवण्यात यश मिळाले नाही. अश्यातच प्रदीपची प्राणज्योत मालवली. तरुण कमावता घरचा एकुलता एक मुलगा आणि घरचा कर्ता-धरता गेल्याने कुटुंबियांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मृतक प्रदीपच्या मागे आई, पत्नी व दोन लहान मुलं आहे यामुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाच्या योजनेतून पाच लाख रुपयाची तातडीची आर्थिक मदत करावी अशी मागणी (Shivsena) शिवसेना तालुका प्रमुख भरत ज्ञानोबा बिरादार यांनी जिल्हाधिकारी याना जिवतीची तहसीलदार यांच्या हस्ते पाठविण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमाने केली. निवेदन देताना शिवसेना तालुका संघटक गणेश पवार, रामेश्वर राठोड, किरण राठोड, प्रफुल्ल चौहान आणि शिवसैनिक उपस्थित होते. (jiwati) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top