Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: इन्फंट कॉन्व्हेंट ने केले 'फॅमिली फन डे' कार्यक्रमाचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चिमुकल्यांनी घेतला आई - वडीलांसह खेळांचा आनंद आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी राजुरा (दि. ६ मार्च २०२३) -         इन्फंट जीजस स...
चिमुकल्यांनी घेतला आई - वडीलांसह खेळांचा आनंद
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. ६ मार्च २०२३) -
        इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे नर्सरी, युकेजी, एलकेजीच्या विद्यार्थ्यांसाठी 'फॅमिली फन डे' कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आई - वडीलांसह विविध खेळ, नृत्य यांचा आनंद घेतला. यात स्पाॅट द कलर, हूप बॅलन्सिंग, आप्टिकल रेस, डक रेस, म्युझिकल कोन अशा विविध खेळांचा समावेश होता. अनेक पालकांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. (Infant Jesus English Public High School)

        या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top