Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अनाथ व्यक्तींना भेटवस्तू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सहारा संस्था देत आहे अनाथांना सहारा आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर -         समाजात अनाथांची कामे करणे, हेच कर्तव्य समजणारे सुनीलभाऊ जुमन...
सहारा संस्था देत आहे अनाथांना सहारा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर -
        समाजात अनाथांची कामे करणे, हेच कर्तव्य समजणारे सुनीलभाऊ जुमनाके हे अनाथांचे सर्वार्थाने देवदूत ठरले आहेत. त्यांच्या या कामाचा प्रेरणादायी प्रवास नक्कीच सगळ्यांना दिशा देणारा ठरणार आहे. असे सहारा बहुउद्देशीय संस्थेच्या आश्रमात भेट देत संजय साळवे यांनी सांगितले. 

        संजय साळवे यांनी आज घुघूस जवळील नकोडा येथील सहारा बहुउद्देशीय संस्थेच्या आश्रमात सदिच्छा भेट देत अनाथ व्यक्तींना, मानसिक खच्चीकरण झालेल्या व्यक्तींना भेटवस्तू उपहार स्वरूपात दिल्या. संजय साळवे यांनी सहारा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनीलभाऊ जुमनाके यांच्या कार्याचे कौतुक केले. सुनीलभाऊ जुमनाके यांनी सांगितले कि, ही संस्था निरपेक्ष भावनेतून कार्य करीत असून आपणही समाजाचे काही देणे लागतो अशी भावना ठेवणारे लोक संस्थेला नेहमी मदतीचा हात देत असतात म्हणूनच आम्ही हे करू शकत आहो असे सांगितले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top