Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सिर्सीत CFR आराखडा बैठकीचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
टाटा सामाजिक विज्ञान संस्थान मुंबई चे संशोधन अधिकारीही होते उपस्थित विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी राजुरा -         राजुरा ता...
टाटा सामाजिक विज्ञान संस्थान मुंबई चे संशोधन अधिकारीही होते उपस्थित
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी
राजुरा -
        राजुरा तालुक्यातील मौजा सिर्सी येथे अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ नियम २००८ व सुधारित नियम, २०१२ नुसार  कलम ५ आणि कलम ३(१)(झ) नुसार अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वन निवासी यांना "निरंतर वापर करण्यासाठी पारंपारिकरित्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वन स्त्रोतांचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन किंवा व्यवस्थापन करण्याचा हक्क" प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन निर्णय ६ जुलै २०१७ च्या अनुषंगाने सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीला अनुसूचित जमातीचे वन निवासी व इतर पारंपारिक वन निवासी यांच्या फायद्यासाठी अश्या सामूहिक वन संपत्तीचे निरंतर व समसमान व्यवस्थापन, संवर्धन, व्यवस्थापन करण्यासाठी वन विभागाच्या सूक्ष्म योजना किंवा चालू योजना, व्यवस्थापन योजना बरोबर फेरबदलानिशी एकत्रीकरण करण्याचे अधिकार प्रदान केलेले आहे. त्याच संदर्भाने या बैठकीत व्यवस्थापन आराखड्या विषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीत सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व अमोल कुकडे, जगदिश डोळसकर (संशोधन अधिकारी) टाटा सामाजिक विज्ञान संस्थान मुंबई हे उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top