Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मंदिराजवळ नवजात अर्भक आढळले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पाळीव श्वानाने आणून दिले लक्षात अर्भकाच्या भोवती लागल्या होत्या मुंग्या आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी भद्रावती -         भद्रावती शहरातील...
पाळीव श्वानाने आणून दिले लक्षात
अर्भकाच्या भोवती लागल्या होत्या मुंग्या
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
भद्रावती -
        भद्रावती शहरातील ऐतिहासिक चंडीका मंदिर परिसरात आज दिनांक ८ ला सकाळच्या दरम्यान एक पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळले. घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अर्भकाला ताब्यात घेतले व स्थानिक ग्रामीण रुग्णालयात त्याच्या आरोग्याची तपासणी करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपुर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी या अर्भकाला बघण्यासाठी मंदिर परिसरात अलोट गर्दी केली होती.

        सकाळी या अर्भकाची चाहुल एका पाळीव श्वानाला लागली. श्वानाने विशीष्ट आवाजात मालकाजवळ येऊन ओरडने सुरु केले. मालकाने श्वानाच्या मागे जाऊन बघितल्यानंतर त्यांना हे अर्भक आढळले. याची माहिती पोलीसांना देण्यात आली. या अर्भकाच्या भोवती मुंग्या लागल्या होत्या. पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेऊन त्याची ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी केली व त्याला पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. या या नवजात अर्भकाच्या अज्ञात आईला शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा वार्डावार्डात जाऊन तपास करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top