Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपुरात तरुणाचा निर्घृण खून केल्यानंतर शिरच्छेद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जुना वैमनस्यातून केली धारधार शास्त्राने हत्या - धडावेगळे केले शीर आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी चंद्रपूर -         चंद्रपूरलगत असलेल्या द...
जुना वैमनस्यातून केली धारधार शास्त्राने हत्या - धडावेगळे केले शीर
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर -
        चंद्रपूरलगत असलेल्या दुर्गापूर परिसरात चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट जवळ नायरा पेट्रोल पंपजवळ एका इसमाची धारदार शस्त्राने धडावेगळे शीर करून निघृण हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास घडली. महेश मेश्राम (32) रा. आयप्पा मंदिर परिसर चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे बोलले जात आहे. मात्र याला दुजोरा मिळाला नाही। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे.

        विशेष म्हणजे, घटनास्थळापासून काहीच अंतरावर दुर्गापूर पोलीस ठाणे आहे. सुमारे ४-५ जणांनी मिळून आरीने शीर कापून हत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती होताच दुर्गापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच घटनास्थळावरून हलविला. दुर्गापूर परिसर हा गुन्हेगारीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानला जातो. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. मृतकाने काही दिवसांपूर्वी कुणाला तरी मारहाण केली होती. यातूनच ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळाजवळ इमली बियर बार आहे. या बारमध्ये भांडण झाले. येथून महेश मेश्राम याला अज्ञात आरोपीनी मारहाण करीत पेट्रोल पंप परिसरात नेले तेथे दगडाने मारहाण केली. यानंतर धारधार शस्त्राने शीर धडावेगळे करून हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. रात्री 12.20 वाजता पोलीस अधीक्षक रवींदसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.

आमचा विदर्भ न्यूज पोर्टल ला आताच FOLOW करा 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top