Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आझाद गार्डन योग नृत्य परिवारातर्फे समाधी वॉर्डात स्वच्छता अभियान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी चंद्रपूर -         चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेत योग नृत्य आझाद गार्डन...
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर -
        चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेत योग नृत्य आझाद गार्डन टीमद्वारे सहभागी होऊन गोविंद स्वामी मंदिर समाधी वॉर्ड येथे स्वच्छता करण्यात आली.

        समाधी वार्ड येथे असलेले गोविंद स्वामी मंदिर हे गोंडकालिन पुरातन मंदिर आहे. मात्र दुर्लक्षित असल्याने या गोंडकालिन पुरातन मंदिराची अवस्था चांगली नाही. आझाद गार्डन योग नृत्य परिवाराच्या हे लक्षात येताच मंदिराचा कायापालट करण्याचे योगनृत्य परिवाराने ठरविले. गोपाल मुंदडा यांच्या मार्गदर्शनात मुग्धा खांडे यांनी आपली टीम घेऊन स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. परिसरातील लोकांचाही मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन मंदिराचा स्लॅब गळत असल्याने टीम सदस्यांनी निधी गोळा करून लोकसहभागातुन मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा करावयाचे ठरविले आहे.

        प्रकाश कवीश्वर, किरण अनंदांकर,अनिल अंदनकर, अ‍ॅड. पुराणकर, संजय गायकवाड,दुर्गोपुरोहित आणि समाधी वॉर्ड मधील इतर नागरिकांचा लोकसहभाग मोहीमेस मिळत आहे. स्वच्छतेची मोठी स्पर्धा घेण्यासाठी व स्वच्छता कार्यात सर्व सामाजिक संस्थांद्वारे लोकसहभाग वाढविण्याची संधी दिल्याबद्दल आझाद गार्डन योग नृत्य परिवारातर्फे चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top