राजुरा -
राजुरा तालुका मंडप डेकोरेशन व बिछायत असोसिएशनची कोजागिरी नुकतीच सुपर मार्केट हॉल मध्ये संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून गणेश वंदना करून करण्यात आली. त्यानंतर मंडप डेकोरेशन व बिछायत असोसिएशनचे स्व. बबलू चौधरी यांना दोन मिनिट मौन पाळत श्रद्धांजली देण्यात आली.
यावेळी वैद्य आणि चौधरी कुटुंबीयांचा सन्मान तसेच या व्यवसायातील अनुभवी पांडुरंग पा. रागीट, भाऊजी पा. लांडे, सुरेश साखरकर यांचा सत्कार करण्यात आला. राजुरा क्षेत्रातील हॉल संचालक प्रशांत गुंडावार व दिनेश आकनूरवार, सुरेश साखरकर, वैभव आईटलावार, प्रा. देवराव भोंगळे, श्रीमती रेखा देशपांडे, आशीष यमनुरवार, पंढरी बोंडे आणि मस्तान बेग यांचे स्वागत करण्यात आले.
संचालन श्रीमती ज्योत्सना अजय बाबूलकर, शिवानी खमानकर यांनी तर आभार मस्तान बेग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विजय खोके, उमेश रोहणे, मंगेश काकडे, अजय बाबूलकर, वैभव वैद्य, वैभव लांडे, सुरेश रागीट, अमित साखरकर, अनंता गोखरे व तालुक्यातील सर्व मंडप व बिछायत व्यावसायिकांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.