Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शहीद क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचे बलिदान भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देईल - सौ. सविता टेकाम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूरात क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके स्मृतिदिनी श्रद्धांजली अर्पण धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर -         रवि...
गडचांदूरात क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके स्मृतिदिनी श्रद्धांजली अर्पण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
        रविवार दिनांक 21 ऑकटोबरला स्थानिक शेडमाके चौकात 1857च्या भारतीय स्वातंत्र युध्दात ब्रिटीश सरकारला सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतीकारक, राष्ट्रीय योध्दा शहीद क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके याना स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
        शहीद वीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा सौ. सविता सुरेश टेकाम यांनी फुलांचे हार टाकुन, पूजन करुन श्रद्धांजली अर्पण केली. प्राणहितेचा पुत्र, गोंडवनाचा शेर अशा अनेक उपाधींनी गौरविलेले शहीद क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचे बलिदान भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देईल असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम यांनी केले. यावेळी नगरसेवक अरविंद मेश्राम, अनिल सिडाम, शरद मेश्राम, जीतू मड़ावी, सुरेश टेकाम, सोहिल शेख, महेश परचाके व शेकडो नागरिक उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top