Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर शहरात नवरात्रची धूम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - कोरोना मुळे 2 वर्ष नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करता आला नाही. मात्र यावर्षी कोरोना चे न...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरोना मुळे 2 वर्ष नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करता आला नाही. मात्र यावर्षी कोरोना चे निर्बंध उठविल्यामुळे नवरात्र उत्सव  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहेत. गडचांदुर शहरातील अचानक मंदिर, कन्यका मंदिर व अमलनाला रोडवरील भवानी माता व महालक्ष्मी मंदिरात महिला भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहेत.
शहरात 40 व ग्रामीण भागात 75 सार्वजनिक मंडळांनी दुर्गादेवी व शारदादेवी ची प्राणप्रतिष्ठा केली आहेत. शहरातील प्रमुख रस्ते आकर्षक विद्दुत रोषणाई ने चमकत आहे. दांडिया खेळायला आणि बघण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहेत. दुर्गा मंडळ तर्फे विविध प्रकारच्या स्पर्धा चे आयोजन होत असल्याने महिलांचा उत्साह वाढला आहे. शांतता व सुव्यवस्था च्या दृष्टीने गडचांदुर पोलीससांनी चोख बंदोबस्त  ठेवला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले जातीने लक्ष देत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top