Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रक्तदानासाठी युवकांनी पुढे यावे - अरुण धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रक्तदानासाठी युवकांनी पुढे यावे - अरुण धोटे 65 युवकांनी केले रक्तदान नांदा फाटा युवा मित्र परिवाराचे तर्फे रक्तदान शिबिर आयोजित धनराजसिंह शे...
रक्तदानासाठी युवकांनी पुढे यावे - अरुण धोटे
65 युवकांनी केले रक्तदान
नांदा फाटा युवा मित्र परिवाराचे तर्फे रक्तदान शिबिर आयोजित
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखल्या जातो. युवकांनी समजाच काही देणं लागते या उद्देशाने समाजात सक्रीय राहून समाजकार्य केले पाहिजे. त्याच प्रमाणे रक्तदान सुध्दा काळाजी गरज आहे. आजही रक्तदान करण्यास अनेक युवक पुढे निघत नाही. अश्या रक्तदान शिबिरात युवकांनी हिरहिरीने सहभाग घेऊन रक्तदान करण्यास पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. ते नांदा फाटा येथे आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि सत्कार सोहळ्यात बोलत होते. 
नांदा फाटा येथे आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नांदा वा नांदाफाटा येथील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले. जवळपास 65 युवकांनी रक्तदान केले.
अरुण धोटे पुढे म्हणाले, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान समजल्या जाते. रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचतात याची प्रचिती कोरोना काळात देखील आली. त्यामुळे युवकांनी रक्तदानास पाहिले प्राधान्य दिले पाहिजे. प्रसंगी माजी सरपंच शामसुंदर राऊत, माजी जिप सदस्य शिवचंद्र काळे, माजी उपसपंच पुरुषोत्तम आस्वले, शिवाजी इंग्लिश स्कूल मुख्याध्यापिका अलेक्सेंडर डिसुजा, प्रकाश बोरकर, चांगदेव बोडखे, नामदेवराव पाचभाई, डॉ राहुल लांडे, डॉ. राहुल भोयर, बापुराव बोनगिनवार, ठनुजी पाचभाई, गौतम धोटे व कनिक्ष ताकसांडे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेकरिता आकाश बोनगिरवार, चंदू राऊत, रवी बंडीवार सोबतच अनेक युवकांनी परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top