Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धिडसी-निर्ली-साखरी बस सुरु करा - बबन उरकुडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धिडसी-निर्ली-साखरी बस सुरु करा - बबन उरकुडे विद्यार्थ्यांसोबत बबन उरकुडे यांनी दिले आगार प्रमुखाला निवेदन त्वरित बस चालू करणार आगार प्रमुखां...
धिडसी-निर्ली-साखरी बस सुरु करा - बबन उरकुडे
विद्यार्थ्यांसोबत बबन उरकुडे यांनी दिले आगार प्रमुखाला निवेदन
त्वरित बस चालू करणार आगार प्रमुखांचे आश्वासन
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील कढोली समोर पूल बंद असल्यामुळे धिडसी-निर्ली-साखरी बससेवा बंद आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना ये-जा करायला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हीच समस्या घेऊन परिसरातील विध्यार्थ्यांनी बबनभाऊचे कार्यालय गाठले आणि आपली व्यथा मांडली. संबंधित विषयाला घेऊन बबनभाऊंनी विद्यार्थ्यांसह आगार गाठले आणि निवेदन देऊन लवकरात लवकर बसेसेवा चालू करण्याची मागणी केली.
यावर आगार प्रमुखांनी लवकरच बससेवा चालू करणार असे आश्वासन दिले. यावेळी विभागप्रमुख संदीप वैरागडे, धिडशी गावचे शिवसेना शाखा प्रमुख समाधान कोरडे, आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top