Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भेंडवीघाट ते परमडोली मार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भेंडवीघाट ते परमडोली मार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे मनसे ने सुरू केले  अन्नत्याग  आंदोलन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर - स...
भेंडवीघाट ते परमडोली मार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे
मनसे ने सुरू केले अन्नत्याग आंदोलन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
स्वतंत्रता मिळण्याअगोदारच्या आधीकाळापासून जिवती तालुक्यात लोक वास्तव्यास असून देशाने 75 वा अमृत महोत्सव नुकताच साजरा केला. परंतु जिवती तहसील येथील गावातील शेवटच्या गावापर्यंत रस्ता उपलब्ध नाही ही शोकांतिका आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांनी जिवती तहसील येथे मोठ्या प्रमाणात पक्के रस्त्याचे काम सुरू केले व त्यातच भोयेगाव ते परमडोली कोटा पर्यंतचे महामार्ग एका महिन्यात उखडून चिखलमय झाला व भेंडवी घाट ते परमडोली पर्यंतचा सुरू असलेला महामार्गाचे काम निष्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे नाईक नगर, चिखली, पाटण, तुमरीगुडा या गावातील महामार्ग, रस्ता अवघ्या पंधरा दिवसात उखडून गायब झाला या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या जिवती महिला तालुकाध्यक्ष शिवगंगा मठपती यांनी दिनांक 20 /08/ 2022 रोजी पासून अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top