Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आगीमुळे कार जळून खाक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आगीमुळे कार जळून खाक गडचांदूर आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी गावची घटना धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - गडचांदू...
आगीमुळे कार जळून खाक
गडचांदूर आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी गावची घटना
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारला अचानक आग लागून वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. घटनेच्या वेळी गाडीत कोणीही नसल्याने कोणीही जखमी झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार दि. 24/08/22 रोजी पांडुरंग थोरात यांनी त्यांच्या वैयक्तिक टाटा इंडिका वाहन क्र. एमएच 34 एए 0280 ही गाडी गडचांदूर जवळील खिर्डीफाटेजवळ रस्त्याच्या कडेला उभी करून त्यांच्या शेतात गेली. काम आटोपून परत आल्यानंतर कारमधील आगी आणि धूर पाहून घाबरले. घटनेची माहिती तात्काळ गडचांदूर पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच गडचांदूरचे ठाणेदार सत्यजित आमले यांनी अग्निशामक वाहन व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. घटनास्थळी पोलीस कर्मचारी संदीप अडकिणे, ढवणे उपस्थित होते. आग लागण्यांचे कारण मात्र कळू शकले नाही. पुढील तपास गडचांदुर पोलिस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top