Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नगरपरिषद इमारतीचे दुसऱ्यांदा लोकार्पण !
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नगरपरिषद इमारतीचे दुसऱ्यांदा लोकार्पण ! नागरिकांत आश्चर्य - नेतृत्व कोणाच आणि कर्तुत्व कोणाचे सादिक थैम - आमचा विदर्भ प्रतिनिधी वरोरा - येथी...
नगरपरिषद इमारतीचे दुसऱ्यांदा लोकार्पण !
नागरिकांत आश्चर्य - नेतृत्व कोणाच आणि कर्तुत्व कोणाचे
सादिक थैम - आमचा विदर्भ प्रतिनिधी
वरोरा -
येथील नगरपरिषद इमारतीचा लोकार्पण सोहळा आटोपून या इमारतीतून कामकाज सुरू झाले असतांना पावणे दोन वर्षांनंतर पुन्हा त्याच इमारतीचा लोकार्पण सोहळा करण्याची किमया येथील नगरपरिषद प्रशासक करीत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी येथील नगरपरिषदेची सर्व सोयींनी युक्त अशी इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे सात कोटी रुपये खर्च करण्यात आले. या इमारतीसाठी माजी अर्थ मंत्री सुधीर मूनगंटिवार यांनी निधी दिला होता. माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली हा निधी आणून ईमारतीचे उद्घाटन सुद्धा केले होते. 
या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नगरपरिषद जुन्या इमारतीतून २० आक्टोबर २०२० ला नवरात्रीच्या दिवशी नवीन इमारतीत स्थानांतरीत झाली. यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी सूर्यकांत पिजदूरकर, विरोधी पक्षनेते गजाननराव मेश्राम, सर्व नगरसेवक, नगरसेविका व समस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 
नवीन इमारतीत कामकाज सुरू होऊन २० महिन्यापेक्षा जास्त कालावधी आटोपला असतांना १६ जुलै २०२२ ला होणार्‍या दुसऱ्यांदा नगरपरिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळा आयोजित केला गेलेला आहे हि बाब असंवैधानिक असून मुख्याधिकारी यांचा कार्यावर प्रश्न निर्माण झाले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top