Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खासदार बाळू धानोरकर यांचा वाढदिवसानिमित्य शैक्षणिक साहित्याचे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खासदार बाळू धानोरकर यांचा वाढदिवसानिमित्य शैक्षणिक साहित्याचे वाटप आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राचे लोक...
खासदार बाळू धानोरकर यांचा वाढदिवसानिमित्य शैक्षणिक साहित्याचे वाटप
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर नप प्राथमिक शाळा व डॉ. जाकिर हुसेन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन्सिल व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमातून गरीब विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्य दिले असून त्याला यातून गरीब विद्यार्थ्यांना थोडंस का होईना नक्की दिलासा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी विनोद कावळे, संदिप आदे, उमेश गोरे, प्रतिक कावळे, अमृत दुर्गे, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद आदींची उपस्थिती होती. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top