Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: इरई धरणाचे सातही दरवाजे दिड मीटरने उघडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
इरई धरणाचे सातही दरवाजे दिड मीटरने उघडले आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क चंद्रपूर - चंद्रपूर येथील इरई धरणाची पातळी सोमवारी सकाळी 10 वाजून 45 मि...
इरई धरणाचे सातही दरवाजे दिड मीटरने उघडले
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
चंद्रपूर येथील इरई धरणाची पातळी सोमवारी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी 206.825 मिटरपर्यंत गेल्याने धरणाचे सातही दरवाजे 1.25 मिटरने उघडण्यात आले आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी ते वाढवून दिड मिटर करण्यात आले. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून, इरई धरणाच्या पाण्यामुळे इरई नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निम्न वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडल्याने वर्धा नदी तुंबली आहे. इरई धरणाचेही दारे उघडल्याने ही या नदीतील पाणी वाहून जाण्यास अडचण होणार असल्याने नदीकाठीच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top