Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भर पुरात बोटीच्या साहाय्याने वीज सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भर पुरात बोटीच्या साहाय्याने वीज सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न बघा व्हिडीओ आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क सिरोंचा - दिनांक 9 जुलै पासून सिरोंचा ...
भर पुरात बोटीच्या साहाय्याने वीज सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न
बघा व्हिडीओ
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
सिरोंचा -
दिनांक 9 जुलै पासून सिरोंचा येथील वीजसेवा, इंटरनेटसेवा विस्कळीत झाली आहे. तेव्हा पासुन महावितरण व दुरसंचार विभागाच्या कर्मचाऱ्यांची झोप उडाली होती. परंतु दिनांक 13 जुलै ला सिरोंचा येथील प्राणहिता नदीला पाणी वाढल्यामळे पुर परिस्थिती निर्माण झाली. नदी नाले उथांग भरुन
आले आणि सिरोंचा मधून जाणारे मार्ग पूर्णपणे बंद झाले. सोबतच इंटरनेट सेवा ही ठप्प झाली, वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे वारंवार खंडित होणार वीज पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु होता. विजेचा वारंवार लपंडाव सुरु होता परंतु वीज पूर्णत: बंद झाली नाही. इंटरनेट सेवा बंद होण्यामागे कारण बामणी येथील 33 केव्ही लाईन बंद होती आणि वीजचे तार पाण्याच्या प्रवाहात होते असे समजताच दिनांक 13 जुलै रोजी विज वितरण विभागाचे कर्मचारी अनिल मडावी, वरीष्ठ तंत्रज्ञ, गणेश जिल्लेला, तंत्रज्ञ हे जीव मुठीत धरुन 4 किमी कारसपल्ली नाल्यात पायदळ जाऊन वीज खंडीत होण्यामागचे कारण (फाल्ट) उघडकीस आणले. त्यानंतर नदीचा पाणी वाढत जाऊन प्राणहिता नदीला पुर आल्यामुळे जाणे अशक्य झाले. तेव्हा दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी श्रीनिवास कटक, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिरोंचा व रविंद्र नरवाडे, उप कार्यकारी अभियंता, महावितरण यांचे मार्गदर्शनात खंडीत वीज दुरुस्ती करीता बोटद्वारे नदीमार्गे चमु रवाना करण्यात आली. परंतु प्रत्यक्ष फाल्टचे ठिकाणी पोहचे पर्यंत संध्याकाळ झाल्यामुळे आणि अंधारात काही दिसत नसल्यामुळे सदर चमु परत आली. त्यानंतर दिनांक 18 जुलै रोजी पूर्व नियोजन करुन श्रीनिवास कटकू, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिरोंचा व रविंद्र नरवाडे, उप कार्यकारी अभियंता, महावितरण यांचे नेतृत्वात मंगेश मेश्राम, कनिष्ठ अभियंता, बामणी, मधुकर पुल्लुरी, प्रधान तंत्रज्ञ, अनिल मडावी, वरीष्ठ तंत्रज्ञ, गणेश जिल्लेला, तंत्रज्ञ, संजय रायपुरे, शिपाई, जे.के.राजू, वाहनचालक हे वनविभागाचे बोट चालक चंद्रु तोकला यांचे समवेत चमु फाल्टचे ठिकाणी वनविभागाचे बोटद्वारे रवाना झाली. तेव्हा कारसपल्ली नाल्याच्या पुरात 33 केव्ही लाईनचे वायर पाण्यात पुर्णत: डुबले होते. तेव्हा वरील सर्व कर्मचारी यांनी तारेवरची कसरत करुन नदीपात्रात डुबलेले तार काढले. काही ठिकाणी सदर तारेला अडकलेला काडी कचरा काढुन तार खुले करण्यात आले. काही ठिकाणी मोठमोठे लाकडे तारेला अडकुन होते. ते रविंद्र नरवाडे व त्यांची चमु आणि वनपरिक्षेत्र अधिकारी, सिरोंचा यांनी स्वत: बाजूला करुन वरील सर्व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे व बोट चालक चंद्रु तोकला यांच्या मेहनतीमुळे सिरोंचा ते बामणी पर्यंतची 33 केव्ही लाईन सुरु करण्यात यश प्राप्त केले. त्यानंतरच सिरोंचा येथील इंटरनेट सेवा पुर्ववत सुरु झाली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top