Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत अतिरिक्त नवीन मतदान केंद्रांची संख्या वाढवा - सौ. किरण संजय गजपुरे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत अतिरिक्त नवीन मतदान केंद्रांची संख्या वाढवा - सौ. किरण संजय गजपुरे तळोधी (बाळापुर) गांगलवाडी, भिशी, नेरी ...
गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत अतिरिक्त नवीन मतदान केंद्रांची संख्या वाढवा - सौ. किरण संजय गजपुरे
तळोधी (बाळापुर) गांगलवाडी, भिशी, नेरी येथे केंद्राची मागणी
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
गोंडवाना विद्यापीठाच्या  पंचवार्षिक सिनेट निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असुन येत्या ॲागस्ट महिन्यात ती पार पडणार आहे. या निवडणुकीत पदवीधर मतदार संघातून १० सिनेट सदस्य निवडले जाणार आहेत . या निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधरांची संख्या मागील निवडणूकीच्या तुलनेत दुप्पट झालेली आहे . यामुळे २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीच्या वेळी असलेल्या मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी नागभीडच्या अभाविप कार्यकर्त्या व पदवीधर मतदार सौ. किरण संजय गजपुरे यांनी गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. 
मागील सिनेट निवडणुकीत नागभीड, चिमुर व ब्रम्हपुरी तालुक्यात प्रत्येकी एकच मतदान केंद्र व तेही तालुकास्थानावरच असल्याने मतदारांची केंद्र गाठण्यासाठी चांगलीच दमछाक झाली होती. त्यावेळी असलेली गोंडवाना विद्यापीठाची नोंदणीकृत मतदारांची संख्या ११ हजारावरुन आता २४ हजारांच्या जवळ गेलेली आहे. 
यावेळी ग्रामीण भागातील पदवीधारकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असल्याने येत्या निवडणुकीत मतदारांच्या सोयीसाठी मध्यवर्ती ठिकाणी नवीन मतदान केंद्र निर्माण करणे गरजेचे झाले आहे. नोंदणीकृत मतदारांना येत्या निवडणुकीत मतदान केंद्र १० ते १५ किमी. च्या अंतरात असल्यास सोयीचे होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले केंद्र ही २० ते ३५ किमी. दुर अंतरावरील आहेत . ब्रम्हपुरी तालुक्यांतील काही मतदारांना ५० किमी. अंतरावरुन यावे लागते. 
सिनेट मतदारांची होणारी आर्थिक व वेळेची गैरसोय टाळण्यासाठी आता होणाऱ्या सिनेट निवडणुकीत नागभीड तालुक्यात तळोधी (बाळापुर) ब्रम्हपुरी तालुक्यात गांगलवाडी तर चिमुर तालुक्यात भिशी व नेरी अशी अतिरिक्त नवीन मतदान केंद्र तयार करण्याची मागणी नोंदणीकृत मतदारांच्या वतीने अभाविपच्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासनाकडे केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top