Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कारमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कारमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क  घुग्घूस येथून जवळच्या नकोडा वॉर्ड नं. 2 येथील मस्जिद जवळ कार क्रमां...
कारमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क 
घुग्घूस
येथून जवळच्या नकोडा वॉर्ड नं. 2 येथील मस्जिद जवळ कार क्रमांक एम.एच.6 ए.एन.7692 या वाहनात मृतदेह आढळून आला.
गोविंदा रघुनाथ लोणारे वय 45 वर्ष रा. नकोडा असे मृतकाचे नावं असून तो नकोडा ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. तो चार दिवसापासून लापता होता याची तक्रार घुग्घूस पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असता पोलीस शोध घेत होते. मात्र आज सकाळ पासुन मस्जिद जवळील एका घराजवळ उभ्या असणाऱ्या कारमधून बाजूला राहनाऱ्या नागरिकांना दुर्गन्धी येत असल्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली यावेळी एपीआय टोपलमोडे, रवींद्र वाभीटकर, रणजित भुरसे,नितीन मराठे यांनी घटनास्थळी पोहचून मृतकाचे प्रेत ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे शव विच्छेदन करण्यासाठी पाठविले पुढील तपास एपीआय टोपलमोडे हे करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top