Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. आनंदराव अडबाले तर सचिवपदी नामदेवराव बोबडे यांची अविरोध निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. आनंदराव अडबाले तर सचिवपदी नामदेवराव बोबडे यांची अविरोध निवड धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प...
  • सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. आनंदराव अडबाले तर सचिवपदी नामदेवराव बोबडे यांची अविरोध निवड
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारणी मंडळाच्या निवडणुकीत सर्वानुमते अध्यक्षपदी डॉ. आनंदराव अडबाले, सचिवपदी नामदेवराव बोबडे, उपाध्यक्ष तुळशीराम पुंजेकर, सहसचिव विनायकराव उरकुडे, कार्यकारणी सदस्य म्हणून नोगराज मंगरुळकर, माधव मंदे, सौ.नलिनि डोहे, सौ. उज्वला चांदेकर, नारायणराव झाडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून चंद्रकांत गोहोकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी शशांक नामेवार यांनी निवडणूक पार पडली. अविरोध निवड झाल्याबद्दल सर्व पदाधिका \ऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या संस्थेअंतर्गत सुरू असलेले गडचांदुर येथे शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय (कला, विज्ञान व व्यवसाय) सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच पेल्लोरा येथे संजय गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय (कला, विज्ञान व व्यवसाय) आणि कोरपना येथे स्व. हरिभाऊ डोहे गुरुजी विद्यालय म्हणुन कार्यरत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top