Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पारडी ठवरे येथे बौध्द विहार सौंदर्यीकरणासाठी निधी मंजुर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पारडी ठवरे येथे बौध्द विहार सौंदर्यीकरणासाठी निधी मंजुर जिप सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते भुमीपुजन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागभीड -...
पारडी ठवरे येथे बौध्द विहार सौंदर्यीकरणासाठी निधी मंजुर
जिप सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते भुमीपुजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागभीड -
तालुक्यातील पारडी ठवरे येथील बौध्द विहाराचे सौंदर्यीकरणासाठी जिपच्या समाजकल्याण निधीतुन निधी मंजुर झाला असुन या कामाचे भुमीपुजन भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व पारडी-मिंडाळा-बाळापुर जिप क्षेत्राचे सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 
संजय गजपुरे यांच्या पाठपुरावा व प्रयत्नांनी या जिल्हा परिषद क्षेत्रात कोट्यावधी रुपयांची विकासकामे पुर्णत्वास आलेली आहेत. पारडी ठवरे येथे जिप प्राथमिक शाळेच्या विज्ञान वर्गखोलीचे बांधकाम पुर्ण होत आले असुन मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामे संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याने करण्यात आलेली आहेत. याआधी पारडी ठवरे येथील डॅा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण समाजकल्याण निधीतुन तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण खनिज निधीतुन करुन घेतले आहे. 
यावर्षी समाजकल्याण निधीतुन बाळापुर ( बुज.) येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व मिंडाळा येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सौंदर्यीकरणास समाजकल्याण निधीतुन मंजुरी प्राप्त झालेली आहे. तर नवेगाव पांडव येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सौंदर्यीकरणाचे काम याआधीच पुर्ण झाले आहे. 
पारडी ठवरे येथील बौध्दविहार सौंदर्यीकरण भुमीपुजन प्रसंगी उपसरपंच नंदकिशोर खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य निकेश शेंडे, सौ. सुनिताताई दिवाकर ठवरे व सौ. दर्शनाताई गजभिये, बुथ प्रमुख रतिराम ठवरे व अमोल सारये, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय सारये, बौध्द समाज महिला अध्यक्ष करुणाताई सोनडवले व सचिव दीपाताई बागडे यांची उपस्थिती होती. 
पारडी ठवरे गावासाठी समाजकल्याण निधी मंजुर करुन दिल्याबद्दल जिप समाजकल्याण सभापती नागराज गेडाम व जिप सदस्य संजय गजपुरे यांचे सरपंच युवराज दोनोडे व ग्रापं सदस्य तथा बौध्द समाजबांधवांनी आभार मानले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top