Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रामीण भागातील थकित विजबिलापोटी पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन कापण्‍याची मोहीम त्‍वरीत थांबवावी अन्‍यथा आंदोलन करू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्रामीण भागातील थकित विजबिलापोटी पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन कापण्‍याची मोहीम त्‍वरीत थांबवावी अन्‍यथा आंदोलन करू आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मह...
ग्रामीण भागातील थकित विजबिलापोटी पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन कापण्‍याची मोहीम त्‍वरीत थांबवावी अन्‍यथा आंदोलन करू
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महावितरणच्‍या उच्‍च अधिकाऱ्यांसह घेतली आढावा बैठक
ग्रामविकास मंत्र्यांशी दुरध्वनीद्वारे केली चर्चा, पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्‍हयात अनेक ग्राम पंचायत क्षेत्रात पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन थकित विजबिलापोटी खंडीत केले जात आहेत. हा जिल्‍हा विज उत्‍पादक जिल्‍हा आहे. अनेक ग्राम पंचायती या वनव्‍याप्‍त क्षेत्रात आहे. जंगली श्‍वापदांचे हल्‍ले सातत्‍याने होत आहेत. जिल्‍हयातील ११ तालुके मानवविकास निर्देशांकात मागे आहे. अशा परिस्‍थीतीत थकित विज बिलापोटी पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन कापणे ही बाब अन्‍यायकारक आहे. ही मोहीम त्‍वरीत थांबविण्‍यात यावी, अन्‍यथा आम्‍हाला आंदोलनासाठी रस्‍त्‍यावर यावे लागेल, असा ईशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक १८ जून २०२२ रोजी विश्रामगृह चंद्रपूर येथे महावितरणच्‍या अधिका-यांसह बैठक घेत आढावा घेतला. या बैठकीला मुख्‍य अभियंता श्री. देशपांडे, अधिक्षक अभियंता श्रीमती चिवंडे, कार्यकारी अभियंता महेश तेलंग, सुहास पडोळे, उपअभियंता यांच्‍यासह भाजपा नेते रामपाल सिंह, नामदेव डाहूले, राजीव गोलीवार, श्रीनिवास जंगमवार, राकेश गौरकार, सुभाष गौरकार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. जिल्‍हयातील किती ग्राम पंचायतींचे पथदिव्‍यांचे विज कनेक्‍शन खंडीत करण्‍यात आले आहे, थकित विज बिलापोटी किती रक्‍कम शिल्‍लक आहे, याआधी पथदिव्‍यांच्‍या विजबिलाचा भरणा कोण करायचे अशी विचारणा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. पथदिव्‍यांच्‍या विजबिलाचा भरणा सरकार करेल असे आश्‍वासन ऊर्जामंत्र्यांनी विधानसभागृहात दिले आहे, असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ़ यांच्याशी दुरध्वनी द्वारे चर्चा केली असता त्यांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top