- आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागाच्या पाच मंत्र्यांची भेट घेत वेधले चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील प्रश्नांकडे लक्ष
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, क्रिडा मंत्री सुनिल केदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगण भुजबळ, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेतली असुन सदर विभागांसंदर्भातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच संबंधित विभाग बैठक लावेल असे आश्वासन सदर मंत्र्यांनी यावेळी दिले आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. दरम्याण आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथे विविध विभागाच्या मंत्र्यांची भेट घेतली आहे. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी वर्धा नदीवरील धानोरा बॅरेजची तात्काळ निर्मिती करण्यासदंर्भात चर्चा केली हा विषय मार्गी लावण्यासाठी बैठक लावण्याची विनंतीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जयंत पाटील यांना केली. यावर लवकर बैठक लावण्याचे निर्देश जयंती पाटील यांनी संबधित विभागाला दिले आहे .
चंद्रपूर जिल्हा क्रिडा संकुलच्या विकासासाठी 20 कोटी रुपये निधी देण्यात यावा, मा.सा. कन्नमवार बॅटमिंटन कोर्टसाठी ५ कोटी रुपये निधीदेण्यात यावे, विसापूर येथील क्रिडा संकुलाच्या विकासासाठी अतिरिक्त 9 कोटी रुपये देण्यात यावे तसेच घुग्घूस येथे क्रिडा संकुलची निर्मिती करण्यात यावी या मागणीसाठी आ. जोरगेवार यांनी क्रिडामंत्री सुनिल केदार यांची भेट घेतली. यावेळी सदर सर्व विषयांसदर्भात बैठक लावण्याचे निर्देश सुनिल केदार यांनी दिले आहे. शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक लावण्यात यावी तसेच मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी 37 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात यावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी ना. अशोक चव्हाण यांच्या सोबत आमदार किशोर जोरगेवार यांची सकारात्मक चर्चा झाली असुन सदर मागणी संदर्भात बैठक लावण्याचे निर्देश त्यांनी संबधित विभागाला दिले आहे. चंद्रपूर शहरात प्रदुषनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांचीही आज मुंबई मंत्रालय येथे भेट घेतली आहे. यावेळी चंद्रपूरातील वाढत्या प्रदुषणाकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. संजय बनसोडे यांचे लक्ष वेधले. यावर तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात लवकरच बैठक लावण्यात येईल असे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटले आहे. शिवभोजनची संख्या वाढविण्यात यावी, सुरु असलेल्या शिवभोजन केंद्राची नियमीत तपासणी करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी अन्न व नागरी पूरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेतली आहे. याबाबतही मुंबई येथे लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. एकंदरीत पाहता आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व महत्वाच्या विभागातील मंत्र्यांची भेट घेत मतदार संघातील प्रमुख्य प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.