Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करा आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता १० कोटीचा निधी धनराजसिं...

  • नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करा
  • आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता १० कोटीचा निधी
धनराजसिंह शेखावत -  आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे  बांधकाम पुर्ण होऊनही आरोग्य केंद्र सुरु झाले नसल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांना करण्यात आली आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या उपचाराची सोय व्हावी याकरीता आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने विधानसभा क्षेत्रांमध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाकडून मंजूर करवून घेतले प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता दहा कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला. नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीचे काम काम पूर्ण झाले आहेत. आरोग्य विभागाच्या लेट लतीफीमुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रासह महाराष्ट्रातील एकूण जवळपास ८६ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशासनाकडून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे सांगण्यात येत आहे. नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याकरिता आमदार सुभाष धोटे व प्रशासनास अनेकदा निवेदने देण्यात आली आहे. नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याकरिता आमदार सुभाष धोटे यांनी प्रशासनाला सूचना देवून तातडीने नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी गणेश लोंढे व 
महेश राऊत यांनी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top