आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
चंद्रपूर जिल्हातील राजुरा तालुक्यात मिरची पिकाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवट केली जाते. यावर्षी ब्लॅक थ्रीप्स, वातावरणाच्या अनिश्चिततेमुळे व लांबत गेलेल्या पावसामुळे मिरची सारख्या अतिसंवेदनशील पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. शेतकऱ्यांना मिरची पिकाच्या व्यवस्थापनात आणि नियोजनामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने ‘शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद’ कार्यक्रम राजुरा येथे ७ मे ला आयोजित केला होता. या कार्यक्रमात जिल्ह्याभरातील २४ गावातील १५० शेतकरी सहभागी झाले. या कार्यक्रमाला बंगलोरहून येथील मिरची ब्रीडर श्री. शरन बस्पा, डॉ. बी. महेश आणि अजीज मुल्ला यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शक केले तसेच राजुरा तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मक्कपले व मंडळ कृषी अधिकारी चेतन चव्हाण हे उपस्थित होते.
कृषक स्वराजच्या वतीने संस्थेचे संस्थापक व संचालक सतीश गिरसावळे कृषक स्वराजच्या पुढील योजना याविषयी चर्चा केली.तसेच संस्थेच्यावतीने अंकित वडस्कर यांनी जैविक खते व औषध निर्मिती व वापर याबद्दल विस्ताराने शेतकऱ्यासोबत चर्चा केली.
शेतीतील उत्पादकता वाढावी, शेतमालाची गुणवत्ता सुधारावी, शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि शेतमालाला योग्य भाव मिळवा यासोबतच पर्यावरणीय समतोल राखला जावा आणि ग्राहकांना विषमुक्त अन्न प्राप्त व्हावे यासाठी कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न चालू झाले आहे. शेती आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी जागतिक बाजारपेठेत टिकू शकेल अशा गुणवत्तापूर्ण व पर्यावरणकेंद्री शेतकऱ्यांच्या मालकीच्या पिकनिहाय मूल्यसाखळ्या तयार करणे हे कृषक स्वराजचे ध्येय आहे.
या संवाद कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंकित वडस्कर यांनी केले तर कार्यक्रमच्या यशस्वितेकरिता कृषक स्वराजचे अमेय धोटे, देवानंद गिरसावळे, प्रमोद वडस्कर, भास्कर धोटे, अमोल भोंगळे, भाविक पिंपळशेंडे, सौ. वैशाली काटवले यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.