Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खिर्डी आदिवासी सोसायटीवर काँग्रेसचे १३ पैकी ११ उमेदवार बिनविरोध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खिर्डी आदिवासी सोसायटीवर काँग्रेसचे १३ पैकी ११ उमेदवार बिनविरोध आमदार सुभाष धोटे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर धोटे यांच्या न...

  • खिर्डी आदिवासी सोसायटीवर काँग्रेसचे १३ पैकी ११ उमेदवार बिनविरोध
  • आमदार सुभाष धोटे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर धोटे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली निवडणूक
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
तालुक्यातील खिर्डी आदिवासी सोसायटीवर काँग्रेसचे १३ पैकी ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. आमदार सुभाष धोटे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर धोटे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली होती. काँग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना अशी लढत होणार होती. मात्र काँग्रेसच्या ६ उमेदवारांच्या विरोधात विरोधकांचा अर्ज नसल्याने ६ उमेदवारांची पूर्वीच अविरोध निवड झाली. उर्वरित ७ जागांसाठी काँग्रेस व शेतकरी संघटनेने विविध गटातून नामांकन अर्ज भरले. 
५ मे ला नामनिर्देशन वापस घेण्याची तारीख होती. शेतकरी संघटनेने ५ तर काँग्रेसने २ अर्ज मागे घेतल्याने निवडणूक अविरोध पार पडली. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे रामचंद्र कुळमेथे, राजेंद्र मडावी, पद्माकर मडावी, भीमा सिडाम, बापूजी सलाम, अशोक आस्कर, सुरेश राऊत, कमलाकर देरकर, गुलाब जीवतोडे, मंगला पंधरे, मंगल येरमे तर शेतकरी संघटनेचे सुभाष कोडापे, उद्धव लिपटे यांचा समावेश आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top