Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भामरागड तालुक्यात पोलीस आणि नक्षलमध्ये चकमक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भामरागड तालुक्यात पोलीस आणि नक्षलमध्ये चकमक एक पोलीस जवान जखमी जखमी जवानाला हेलिकॉप्टरद्वारे नागपुरात हलविले आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स ...

  • भामरागड तालुक्यात पोलीस आणि नक्षलमध्ये चकमक
  • एक पोलीस जवान जखमी
  • जखमी जवानाला हेलिकॉप्टरद्वारे नागपुरात हलविले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गडचिरोली - 
भामरागड तालुक्यातील धोडराज जंगल परिसरात पोलिस विभागाला नक्षल असल्याची गुप्त माहिती मिळताच सी-६० पोलिस जवानाकड़ून नक्षल विरोधी अभियान राबविले जात असतांना जंगलात आधीच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवान दिसताच अचानक अंधाधून गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरात पोलिस जवानांनीही नक्षल्यांंना जशास-तसे प्रत्युत्तर दिले. मात्र यात एक पोलीस जवान जखमी झाले असून, त्या जखमी पोलिस जवानाला हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.
चकमकी दरम्यान जखमी झालेल्या पोलिस जवानाचे नाव कळू शकले नसले तरी चकमक सुरु असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. चकमकी ठिकाणी पोलिसांनी शोध मोहिम अधिक तीव्र केली असून झालेल्या या चकमकित काही नक्षल्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
घटनास्थळी नक्षल्याचे मोठ्या प्रमाणात साहित्य हस्तगत करण्यात पोलीस जवानाना यश आल्याचे सूत्राकड़ूंन माहिती प्राप्त झाली आहे तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी अतिरिक्त पोलिस कुमक वाढविण्यात आले असून सर्च ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top