Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर राष्ट्रीय सेवा योजना व प्रज्ञाशील करुणा मंडळ यांच्या पुढाकार आमचा विदर्भ - ब्यु...

  • क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
  • राष्ट्रीय सेवा योजना व प्रज्ञाशील करुणा मंडळ यांच्या पुढाकार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून भेदोडा येथील युवकांनी एकत्र येत राष्ट्रीय सेवा योजना पथक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा व प्रज्ञाशील करुणा मंडळ भेदोडा यांच्या संयुक्त विद्यमाने व रक्तपेढी सामान्य रुग्णालय चंद्रपूर च्या सहकार्याने भेदोडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक रोहित दुर्गे व सुप्रिया बोरकर यांनी पुढाकार घेऊन गावातील प्रज्ञाशील करुणा मंडळ भेदोडा च्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भेदोडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले, त्यामध्ये 20 रक्तदात्यांनी रक्तदान करून महान असे कार्य केले. 
यावेळी गावातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या मध्ये भाग घेतला, सकाळी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजउपयोगी कार्यक्रम घेऊन समाजात जागरूकता करणे हे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे कार्य आहे त्यामुळे रासेयो स्वयंसेवक प्रत्येक कार्यात पुढे असतो आणि त्याचाच भाग म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, यावेळी प्रज्ञा शील करुणा मंडळ भेदोडा चे अध्यक्ष वसंता दुर्गे, उपाध्यक्ष किरण कुंभारे, सचिव विश्वनाथ गोवर्धन व सर्व पदाधिकारी व समस्त भेदोडा वासीय व शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम. वारकड व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी उपस्थित होते..

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top