Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था कर्ज वाटप कार्यक्रमात अग्रस्थानी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था कर्ज वाटप कार्यक्रमात अग्रस्थानी  2022-23 या आर्थिक वर्षाकरीता कर्ज वाटपला सुरूवात पहिल्याच दिवशी...

  • कोरपना येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था कर्ज वाटप कार्यक्रमात अग्रस्थानी 
  • 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता कर्ज वाटपला सुरूवात
  • पहिल्याच दिवशी 254 खातेधारक शेतकऱ्यांना 3 लाख 61 हजाराचे कर्ज वाटप
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था रजि.नं. HB165 चा पीक कर्ज वाटप शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला बँकेचे संचालक विजय बावणे, संस्थेचे उपाध्यक्ष रासेकर, बँक व्यवस्थापक सय्यद, बँक निरीक्षक मालेकर, बँकेचे सचिव हेमंत एस. लोडे, लिपिक शब्बीर शेख, शिपाई कवडू मडावी व सदस्य उपस्थित होते. वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता कर्ज वाटप सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशी 254 खातेधारक शेतकऱ्यांना 3 लाख 61 हजार 78 हजार 300 रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. 
शेतकरी वर्गात संस्थेच्या कार्यप्रणाली बद्दल आनंद व्यक्त केल्या जात आहे. संस्थेने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या पीककर्ज योजनेचा लाभ घेण्याचे व्यवस्थापक सय्यद यांनी आवाहन केले आहे. या प्रसंगी संचालक दादाजी गोवारदिपे, मारोती पारखी, विनोद कोल्हे आदी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top