Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने 25 एप्रिल ते दोन मेपर्यंत राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने 25 एप्रिल ते दोन मेपर्यंत राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - राष्ट्रीय...


  • चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने 25 एप्रिल ते दोन मेपर्यंत राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले आणि पौंगंडाअवस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2015 पासून सुरू करण्यात आला आहे. 
राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये एका निश्चित दिवशी जंतनाशक गोळ्या देऊन दोनदा घेण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार  मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहीम येथील अंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावे. म्हणूनच जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम एप्रिल-मे 2022 मध्ये आयोजित करण्यात येत आहे. 
राज्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून 25 एप्रिल ते दोन मे 2022 हा सप्ताह राबविण्यात येणार आहे. 
शहरातील शाळा आणि अंगणवाडीत 25 एप्रिल रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा होणार असून, 29 एप्रिल रोजी माप अप दिन होईल. यामध्ये पहिली ते पाचवी वर्गातील सहा ते दहा वर्षे वयोगटातील शिवाय सहावी ते बारावी या वर्गातील 10 ते 19 वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि क्षयरोग कमी करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या जंतनाशक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top