- चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्राधान्य कुटुंब लाभ अर्थात प्राकुला योजनेचा इष्टांक वाढविण्यात यावा : आ. सुधीर मुनगंटीवार
- अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेणार
- दिव्यांग , विधवा , परित्यक्ता महिलांना प्राकुला योजनेच्या माध्यमातून नियमित धान्य देण्याचे निर्देश
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्राधान्य कुटुंब लाभ अर्थात प्राकुला योजनेचा इष्टांक वाढविण्यात यावा तसेच या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.या संदर्भात लवकरच आपण अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दि .1 एप्रिल 2022 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री भराडी , निरीक्षण अधिकारी श्री तुंबडे , अन्न धान्य वितरण अधिकारी श्री दांडेकर यांच्या सह बैठक घेत वरील विषयाच्या अनुषंगाने आढावा घेतला .प्राकुला योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत .जिल्ह्यातील दिव्यांग , विधवा , परित्यक्ता महिलांना प्राकुला योजनेच्या माध्यमातून धान्य मिळत नाही ही गंभीर बाब आहे. 30 जून 2019 नंतरच्या प्राकुला योजनेच्या कार्ड धारकांना देखील धान्य उपलब्ध झाले नसल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली.
चंद्रपूर तालुक्यातील वढोली-कढोली व चिचोली या तिन्ही गाव मिळून एकच धान्य दुकान हे चिचोली या गावात आहे. दोन्ही गावाच्या मध्ये इरई नदी असल्याने गावातील महिला मानवी साखळी तयार करून नदीपात्रातुन चिचोली येथे जावून धान्य घेतात. हा परिसर बफर क्षेत्रात असल्याने परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असतो. हे धोकादायक आहे.त्यामुळे वढोली येथे एक स्वस्त धान्य दुकान मंजूर करावे असे निर्देश सुचना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
किटाळी येथील ८० टक्के कार्ड धारकांनी दुकानातुन धान्य घेण्यास नकार दिल्याने किटाळी येथे नविन धान्य दुकान मंजूर करण्यासंदर्भात विनाविलंब कार्यवाही करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.
बैठकीला भाजप नेते रामपाल सिंह, मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार , राकेश गौरकार सरपंच पायली-भटाळी ,सौ. प्रज्ञा बोरगमवार, आकाश मस्के, सौ. मंजूश्री कासनगोट्टूवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.