शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चांदसुर्ला (खैरगांव) येथे सहाय्यक शिक्षकांची 4 पदे मंजुर आहे. परंतू सप्टेंबर, 2021 मध्ये शिक्षकांच्या सेवानिवृत्तीने एक पद रिक्त झाले. यामुळे सद्या शाळेत तीन शिक्षक कार्यरत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे.
सध्यास्थितीत शाळेत 1 ली ते 7 वी पर्यंत वर्ग असून पटसंख्या 51 व शिक्षक 3 आहेत. तिन शिक्षकांकडे 7 वर्गाचा भार असून शिक्षकांवर ज्ञानदानाचा मोठा भार पडत आहे. ही बाब नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर द्वारा संघटीत युथ स्ट्रगल ग्रुप, चांद्रसुर्ला (खै.) यांच्या सदस्यांनी गंभीर बाब लक्षात घेतली. शाळेत शिक्षकांची भरती करणे तसेच किचन शेडचे बांधकाम करणे आदी विषयाबाबतचे निवेदन पंचायत समिती सभापती तथा क्षेत्राच्या पं.स. सदस्या केमा रायपूरे यांना देण्यात आले. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष प्रतिक मसराम, सचिव उमेश लाखे, सदस्य कुणाल क्षिरसागर, निखिलेश चाभरे आदींची उपस्थिती होती. प्रसंगी पं.स. सभापती यांनी सकारात्मकता दर्शवित शिक्षकांची रिक्त पदे व किचन शेडचे बांधकाम करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.