Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चनाखा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चनाखा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त चनाखा येथे जिल्...

  • चनाखा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त चनाखा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ग्राम पंचायत, सावित्रीबाई महिला ग्राम संघ आणि गावातील सर्व महिला बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. 
संचालन कोंडेकर सर यांनी केले तर प्रस्तावना मुख्याध्यापक सत्रे सर यांनी केले.  कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंच सौ. रेखाताई आकनुरवार, कार्यक्रमाचे उद्घाटक उपसरपंच विकास देवाळकर, मार्गदर्शक ग्राम सचिव मंजुषा पारखी लोहे, प्रकाश दुर्योधन, राजेश सातपुते, सौ. ज्योत्स्ना वानखेडे, सौ. प्रतिभा मडावी सौ सुनिताताई सातपुते, ग्राम पंचायत सदस्य, जगदीश सातपुते तं.मु. अध्यक्ष, प्रविण वडस्कर शा. व्य. स. अध्यक्ष, सौ प्रियंका बोबडे शा. व्य. स. उपाध्यक्ष. सुनिता मडावी सदस्य उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने सरपंच सौ रेखाताई आकनुरवार व ग्राम सचिव सौ मंजुषा पारखी लोहे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
यावेळी गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना पारीतोषिक देण्यात आले. यात वैयक्तिक नृत्य प्रथम चैतन्या गेडाम, द्वितीय तनुष्का बोढे. समुह नृत्य  प्रथम प्रिती कोवे व संघ. द्वितीय सानवी आकनुरवार व संघ. वैयक्तिक गायन प्रथम प्रियंका बोबडे, द्वितीय शोभा लोखंडे. समुह गायन प्रथम गिता जिवने व संघ. द्वितीय श्रावणी रामटेके व संघ याना देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सौ कविताताई सिडाम सि.आर.पी., सौ शोभा लोखंडे ग्रा.सं. अध्यक्ष, सौ. पौर्णिमा रामटेके यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top