- अबब चक्क मंडळ अधिकाऱ्यालाच तंगडे तोडून देण्याची धमकी
- रेती चोराची अरेरावी.... पोलिसांत तक्रार दाखल
- रेती तस्करीला खतपाणी घालणारेच महसूल अधिकारी रेती तस्करांच्या शिव्या खातात तेव्हा....
- बघा व्हिडीओ
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली कि, ते त्यांचे मित्र सादीक हाशमी रा. राजूरा यांचेसह खाजगी वाहनाने राजूरा वरुन कोरपना येथे ड्यूटीवर जात असतांना त्यांना मुखबीरव्दारे माहिती मिळाली की, मौजा पिपरी गावाजवळील नाल्यामध्ये रेतीने भरलेले ट्रॅक्टर फसले आहे. मौक्यावर गेले असता तिथे एक ट्रॅक्टर चिखलात फासलेले दिसले तर दुसरा ट्रॅक्टर पलटी झालेला दिसला. तिथे हजर असलेले दिलीप मुद्दलवार आणि त्याचा भाउ व राहूल नवले व इतर लोक मिळून फसलेले ट्रॅक्टर ट्राक्टरला काढत होते. फसलेल्या ट्रॅक्टर मध्ये रेती खाली करुन दुसऱ्या ट्रॅक्टरने त्या ट्रॅक्टरास ओडून काढले व दोन्ही ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. याबाबत तहसिदार महेंद्र वाकलेकर यांना सदर घटने बाबत माहीती दिली त्यांनी तलाठी विरेंद्र मडावी, प्रकाश कमलवार, विशाल कोसनकर, कोतवाल रुपेश पानघाटे व हरिशचंद्र लटारी यांना तात्काळ घटनास्थळी पाठविले. ट्राक्टरचा मालक नामे दिलीप शंकर मुद्दलवार व त्याचा लहान भाउ दोन्ही रा. नारंडा, राहुल रमेश नवले रा.कळमना व ईतर 7 ते 8 लोक आमचे जवळ आले. तेव्हा त्यांना आम्ही मंडळ अधिकारी आहे अशी ओळख देऊन ह्या रेती घाटाचा लिलाव न झाल्यामुळे तुम्ही कोठुन रेती आणत आहे व तुमच्या कडे वाहतुक परवाना आहे का? रेती विकत घेतलेली पावती आहे का? विचारपूस करीत असतांना दिलीप मुद्दलवार यांनी ट्रॅक्टर पकडल्यास चक्क तंगडे तोडून देण्याची धमकी देत शिवीगाळ केली. तसेच मोबाईल हिसकावुन मोबाईल मधील काढलेले फोटो डिलीट केले व मोबाईल परत दिला. बाचाबाची झाली असता दिलीप मुद्दलवार व त्यांचे इतर साथीदार लाठी-काठीने मारण्यासाठी धावुन आले. शारीरिक बळाचा वापर करत असताना मंडळ अधिकाऱ्याचा डावा हात मुरगाळला व शासकिय कामात अडथळा आणला. सोबतच्या लोकांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला परंतु ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. झालेल्या प्रकाराची ठाणेदार ढाकने यांना माहिती देण्यात आली अशी तक्रार त्यांनी पोलिसांत केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा उद्धटबाजी करणारे पसार झाले होते. सदर ट्रॅक्टर धारकांनी नदीघाटातुन अवैधरित्या अंदाजे 01 ब्रास रेती किंमत 5000रुपये ची चोरी केली आहे. असा आरोप मंडळ अधिकारी पचारे यांनी केला आहे.
पोलिसांनी आरोपी दिलीप मुदलवार, दिलीप चा भाऊ, राहुल रमेश नवले आणि इतर अनोळखी 5 अश्या एकूण 8 लोकां विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 353,143,147 आणि 379 नुसार गुन्हा दाखल केला असून 6 लोकांना ताब्यात घेतले आहे. दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहे. पुढील तपास कोरपना पोलिस स्टेशनचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या नेतृत्वात अविनाश मडावी करीत आहे.
वेळीच मुसक्या आवळल्या असत्या तर हि वेळ आली नसती
कोरपना तालुका गौण खनिज तस्करांसाठी सेफ झोन मानले जाते. मागील काही दिवसापासून 'लक्ष्मीदर्शन' देणाऱ्या अवैध गौण खनिज धारकांची पाठराखण येथीलच काही अधिकारी करीत होते. जे चिरमिरी देत नाहीत अश्या लहान सहान ट्रॅक्टर चालकांवर मात्र कारवाईचा बडगा उघारात होते. आता 'शेकली' तर पोलिसांत तक्रार दाखल करीत आहे अशी चर्चा परिसरात सुरु आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.