- स्वर प्रिती कला अकादमी राजुरा तर्फे लता दिदींना सुरमई श्रद्धांजली
- आभासी पद्धतीने झालेल्या स्पर्धेत 68 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध करणाऱ्या तसेच आपल्या अलौकिक सूरांनी संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्र मूक झाले आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत-कला क्षेत्रावर शोककळा पसरली, संगीत क्षेत्र पोरके झाले. त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन आणि त्यांना सुरमयी श्रद्धांजली देण्यासाठी स्वर प्रीती कला अकादमी द्वारे "स्वर लता सुरमयी श्रद्धांजली स्पर्धा" दि.10 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत आभासी (ऑनलाईन) पध्दतीने घेण्यात आली. उभा स्पर्धेत 68 गायक गायिकांनी सहभाग नोंदविला.
अनेक वर्षांपासून स्वर प्रीती कला अकादमी संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. केवळ चंद्रपूर जिल्हा नाही तर मुबई, ठाणे, पुणे, नाशिक, यवतमाळ, नागपूर येथून स्पर्धकांनी आपले व्हिडीओ गीत पाठविले. एकापेक्षा एक सरस गीत गाऊन 68 स्पर्धकांनी लता दिदींना सूरमयी श्रद्धांजली अर्पण केली. सर्व स्पर्धकांना अकादमीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यातील निवडक स्पर्धकांची एक फेरी होईल व त्या नंतर स्पर्धेचा निकाल घोषीत करण्यात येईल. या "स्वर लता" स्पर्धेसाठी अकादमीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते व संयोजिका सौ. अल्का सदावर्ते व सदस्यांनी स्पर्धेचे आयोजन केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.