Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना - वणी - कोरपना मार्गावर एसटी सेवासुरू करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना - वणी - कोरपना मार्गावर एसटी सेवासुरू करण्याची मागणी या मार्गावरील प्रवाशी झाले आहे त्रस्त बसेस बंद असल्याने खाजगी वाहनांची होत आहे च...

  • कोरपना - वणी - कोरपना मार्गावर एसटी सेवासुरू करण्याची मागणी
  • या मार्गावरील प्रवाशी झाले आहे त्रस्त
  • बसेस बंद असल्याने खाजगी वाहनांची होत आहे चांदी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
आजच्या तारखेला कोरपना येथून वणी मार्गावर  एकही बस फेरी सुरू नसल्याने येथील प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे. राजुरा व वणी आगाराने याकडे लक्ष देऊन तात्काळ रूपाने बस सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकाकडून होते आहे. 
वणी ही परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने दैनंदिन जाणाऱ्या–येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.  मात्र बसेस बंद असल्याने खाजगी वाहनांची चांदी होत आहे.  कोरपना येथून चंद्रपूर, आदिलाबाद या मार्गावर बस सेवा सुरू झाल्या आहे, परंतु वणी मार्गावर अद्यापही एकही बस सुरू झलेली नाही आहे. त्यामुळे कोरपना, तुकडोजी नगर, हेटी , कोडशी, मूर्ती, बोरी, ढाकोरी, गोवारी पारडी, कुरई , डोरली, वेळाबाई, आबई, बोरगाव, खंदाला, शिरपूर, चारगाव, केसूर्ली, मंदर , वाघदरा, लालगुडा, वणी आदी अनेक गावच्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कित्येक तास ताटकळत राहून खासगी वाहनाची वाट पाहत राहावे लागत आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहे. कोरपण्या- वणी मार्गावर जाण्या व येण्यासाठी दोन्हीकडून एसटीबसच्या 4-4 फेऱ्या सकाळी आणि संध्याकाळी  सुरू करणे आवश्यक आहे. या मार्गावर अनेक नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी आदी प्रवास करतात. त्यांना ही बसेस अभावी जाण्या येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहे. यावर प्रश्नावर राज्य परिवहन महामंडळाच्या राजुरा आणि वणी आगार प्रमुखांनी आपसात समन्वय साधून  कोरपना- वणी - कोरपना बस ची फेरी सुरू करून स्थानीय जनतेची गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top