- आवाळपूर-कडोली रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी
- मनसे जिल्हा सचिव प्रकाश बोरकर यांनी सुभाष धोटे यांचे कडे केली मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालु्क्यातील आवाळपूर ते कडोली रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण करून कडोली गावाजवळील पुलाची उंची वाढवण्याचे काम करण्याबाबतचे निवेदन मनसे चे जिल्हा सचिव प्रकाश बोरकर यांनी आमदार सुभाष धोटे यांना दिला आहे.
मागील अनेक वर्षांपासून अवाळपुर ते कडोली रस्ता पूर्ण पणे उखळल्याने येथील स्थानीय नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्या रस्त्यावर लहाण मोठे अनेक खड्डे पडून त्या रस्त्याची गिट्टी, रवाडी निघल्याचे दिसत असून सुध्दा त्या जीर्ण रस्त्या कडे कोणत्याच राजकीय पुढा-यांचे लक्ष नाही असा मोठा आरोप प्रकाश बोरकर ने केला आहे. स्थानीय जि. प. सदस्य व पं. स. सदस्य यांचे सुध्दा त्या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याचे जनतेत बोलल्या जात असल्याचे दिसून येत आहे. आवाळपुर कडोली या रोडवर फार मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव, दिवसा आणि रात्री शिफ्ट मधे डालमीया सिमेन्ट कंपनी मध्ये काम करणारे गडचांदूर, बिबी, नांदा, आवाळपूर, हिरापूर व इतर ही गावातील कामगार बांधव, नांदा आवाळपूर येथे शिक्षण शिकण्या करीता येणारे विद्यार्थी आपला जीव मुठीत धरूण त्या रस्त्यानी प्रवास करीत आहे. अंधार आणि फुटलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात तर त्या रस्त्यानी ये जा करण्याकरीता नागरीकांना व शालेय विद्यार्थाना मोठा त्रास सहण करावा लागतो. गावातील शेतकरी व शिक्षण घेणारे विद्यार्थी सायकल व दुचाकी वाहनाने अनेक वेळा खाली पडून गंभीर रित्या जखमी झाले आहेत. दूध दही विकणाऱ्या शेतकऱ्यांना ह्या रोडवर चालणे अवघड झाले आहे. कडोली गावालगत असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यामध्ये पाणी पूलावरून वाहत असल्याने रहदारी ठप्प पडते. आवाळपूर ते कडोली रस्त्याकडे व पूलाचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याची विनंती केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.